अर्जुन रामपालचा नवा लूक व्हायरल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अर्जुन रामपालचा नवा लूक व्हायरल

बॉलीवूडमधील कलाकार नेहमी आपल्या लूक्, फिटनेस आणि आहारावर विशेष लक्ष देत असतात. किंबहुना त्यांचे लाइफस्टाइल स्टेट्सवर विशेष लक्ष असते. सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने प्रत्येक जणाची आपल्या स्टारवर नजर असते यासाठी स्टारना नेहमी अपडेट राहवे लागते. अशातच बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या अभिनयासोबत त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.

सध्या मात्र अर्जुन एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. अर्जुनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील अर्जुनचा हटके लूक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. अर्जुन त्याच्या नव्या लूकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अर्जुन एखाद्या हॉलीवूड स्टार दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

या नव्या लूकला त्याच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. सध्या अर्जुनचे कमेंट बॉक् त्याच्या कौतुकाने भरलेले आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अर्जुनला ओळखणेही अनेकांना कठीण होत आहे. अर्जुनने नवी हेअरस्टाइल केली असून त्याने केसाला प्लॅटिनम कलर केला आहे. अर्जुनचा हा प्लॅटिनम ब्लॉंड लूक पाहून अनेकांना हा अर्जुनचं आहे का? असा प्रश् पडला आहे.