नेस्को कोविड केंद्रातील १,५०० नवीन रुग्णशय्यांचे लोकार्पण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नेस्को कोविड केंद्रातील १,५०० नवीन रुग्णशय्यांचे लोकार्पण

मुंबई :    गोरेगांव येथील नेस्को मैदानावर स्थित आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संचलित समर्पित भव्य कोविड आरोग्य केंद्रातील दुसऱया टप्प्याचा भाग म्हणून हजार ५०० रुग्णशय्यांचे लोकार्पण राज्याचे उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते  करण्यात आले. या रुग्णशय्यांमध्ये हजार रुग्णशय्या प्राणवायू पुरवठा सुविधेसह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या नवीन क्षमतेसह नेस्को कोविड केंद्राची क्षमता आता हजार ७०० रुग्णशय्या इतकी झाली आहे.   या लोकार्पण प्रसंगी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, उप आयुक्त (विशेष) श्री. संजोग कबरे, अधिष्ठाता (टप्पा ) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्रादे, अधिष्ठाता (टप्पा ) डॉ. राजेश डेरे अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. नितीन सलागरे यांची उपस्थिती होती.   

 

 

नेस्को कोविड केंद्रातील 'सभागृहात एकूण हजार ५०० रुग्णशय्या कोविड बाधित रुग्णांवरील उपचारासाठी नव्याने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये हजार रुग्णशय्या प्राणवायू पुरवठा सुविधेसह तर उर्वरित ५०० सर्वसाधारण रुग्णशय्या आहेत. प्रत्येक रुग्णशय्येनजीक पंखालॉकर  खुर्ची पुरवण्यात आली आहे. आज २०० रुग्णशय्या कार्यान्वित करुन या सभागृहातील सेवेचा प्रारंभ करण्यात आला असून टप्प्या-टप्प्याने सर्व रुग्णशय्या कार्यान्वित केल्या जाणार आहेत.   'सभागृहात एकूण सहा कक्ष आहेत. प्रत्येक कक्षामध्ये २५० ते ३०० रुग्णशय्यांची क्षमता आहे. सर्व कक्षांमध्ये केंद्रीकृत वातानुकूलन सुविधा आहे. तसेच प्रत्येक कक्षामध्ये नर्सिंग स्टेशन अन्न वितरण विभाग, अग्नि नियंत्रण कक्ष, समवेत २४ x  तत्त्वावर कार्यरत फार्मसी कौन्सिलिंग रूम, रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती पुरवण्यासाठी नियंत्रण कक्ष देखील आहे. एकूण नोंदणी कक्ष निरीक्षण कक्ष (१० रुग्णशय्या),  क्ष-किरण विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या नवीन सुविधेसाठी एकूण हजार १०० मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. त्यात ५० सिनियर कन्सल्टंट, १६० निवासी वैद्यकीय  अधिकारी३२० परिचारिका, ४८० रुग्णसेवा सहायक आणि ९० तांत्रिक कर्मचारीवर्ग यांचा समावेश आहे.