पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू

ठाणे : उल्हासनगरमधील नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदासमोरच्या साई सिद्धी या इमारतीचा स्लॅब कोसळून जणांचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी रात्री च्या सुमारास घडली. या इमारतीचे पाचही मजल्यांचे स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळले असल्याची माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी शोधकार्य सुरू असून ढिगारा उपसण्याचे काम ही सुरू आहे. काही प्रमाणात बाजूला काढून मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  दरम्यान १५ मे रोजीही उल्हासनगरमधील मोहिनी पॅलेस या चार मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले