“जे जे संवेदनशील आहेत, ते सगळे मरणार; फक्त राजकारणी जिवंत राहणार”

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“जे जे संवेदनशील आहेत, ते सगळे मरणार; फक्त राजकारणी जिवंत राहणार”

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने मृत्यूला कवटाळलं. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भडकलेल्या मराठी दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी राजकारण्यांवर टीकास्त्र डागलं. “हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार, या पक्षाचा नेता, त्या पक्षाला जाऊन भेटला, अशा दररोज चर्चा सुरू आहेत. या सगळ्यांसाठी वेळ आहे आणि इथे तरुण पोरं मरताहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ नाहीये का? १२-१३ आमदारांच्या नियुक्त्या होण्यासाठी दररोज राज्यपालांकडे जाताहेत आणि यांना वेळ नाहीयेदिल्लीत हेच चाललंय, महाराष्ट्रात हेच चालू आहे. सगळ्या भारतात हेच सुरू आहे. मग राजकारण्यांनीच जगायचं का?,” असा थेट सवाल तरडे यांनी राजकारण्यांना केला.

स्वप्निलच्या आत्महत्येच्या घटनेवर बोलताना प्रविण तरडे यांनी साम या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यवस्था आणि राजकारण्यांबद्दलचा संताप व्यक्त केला. “हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार, या पक्षाचा नेता, त्या पक्षाला जाऊन भेटला, अशा दररोज चर्चा सुरू आहेत. या सगळ्यांसाठी वेळ आहे आणि इथे तरुण पोरं मरताहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ नाहीये का? १२-१३ आमदारांच्या नियुक्त्या होण्यासाठी दररोज राज्यपालांकडे जाताहेत आणि यांना वेळ नाहीयेदिल्लीत हेच चाललंय, महाराष्ट्रात हेच चालू आहे. सगळ्या भारतात हेच सुरू आहे. मग राजकारण्यांनीच जगायचं का?,” असा रोखठोक सवाल तरडे यांनी केला.

 “फुटपाथच्या कामातून पैसै खाणाऱ्या, त्यासाठी रस्ते उकरणाऱ्या या माणसांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडॉल करून बसलोयमग असेच तरुण मरणार! एपीएससी-युपीएससी करणारे मरणार, शेतकरी मरणार, कलाकार मरणार, लेखक मरणार. काल एक कलादिग्दर्शक मेला. जे जे संवेदनशील, सर्जनशील आहेत, ते सगळे मरणार आणि फक्त राजकारणाशी संबंधित लोक जिवंत राहणार, त्यांच्याबद्दल काही बोलायला जावं तर ट्रोल करतात. ट्रोल करणाऱ्यांना हे माहिती नाहीये की, एक दिवस आपल्याच घरातील कुणीतरी मरणार आहे. या देशात आणि राज्यात सुखी फक्त हेच (राजकारणी) लोक जिवंत राहणार आहेत,” अशी खंत प्रविण तरडे यांनी व्यक्त केली.