कलाधिपती गणरायाकडे ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील मल्हार आणि चित्राचं साकडं

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कलाधिपती गणरायाकडे ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील मल्हार आणि चित्राचं साकडं

घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळतंय. आपले सगळ्यांचे आवडके कलाकारदेखील गणरायाच्या सेवेत लीन झाले आहेत. कलाधिपती गणपती आणि कलाकारांचं तसं फार जवळचं नातं असतं. यात लाडक्या गणरायाकडेजीव माझा गुंतलामालिकेतील  कलाकारांनी देखील मनातील इच्छा व्यक्त केली आहे.

जीव माझा गुंतलामालिकेतील मल्हारने गणरायाकडे करोनाच्या काळात हातचं काम गेलेल्यांना पुन्हा काम मिळावं असं साकडं घातलं आहे. त्यासोबत मल्हार म्हणजेच सौरभ चौघुलेने मनातली एक इच्छादेखील बाप्पाकडे व्यक्त केली आहे.

तसचं या या मालिकेतील चित्रा म्हणजेच अभिनेत्री प्रतिक्षा मुंगेकर बाप्पाच्या सेवेत रमली आहे. गरजु व्यक्तींसाठी हातून चांगल काम घडावं यासाठी तिने गणपती बाप्पाकडे साकडं घातलं आहेत. तसचं मनोबल वाढण्यासाठी बाप्पाचे आशिर्वाद तिने मागितले आहे.