अमेरिकन सैन्याचे लष्करी हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अमेरिकन सैन्याचे लष्करी हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

सॅन दिएगो / नवी दिल्ली : अमेरिकन सैन्याचे एमएफ-६० एस हे लष्करी हेलिकॉप्टर सॅन दिएगोच्या किनारपट्टीजवळ समुद्रात कोसळले. या हेलिकॉप्टरने यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण घेतले होते. हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच तात्काळ शोधमोहिम हाती घेण्यात आली. अद्यापपर्यंत हेलिकॉप्टरबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरने मंगळवारी दक्षिण कॅलिफोर्नियातील समुद्रात विमानवाहू युद्धनौकेवरुन उड्डाण घेतले. सॅन दिएगोपासून सुमारे ६० नॉटिकल मैल अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले. उड्डाण घेत असताना हे विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. अद्यापपर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.