काश्मिर भारताचा अविभाज्य भाग, पाकला ठणकावले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काश्मिर भारताचा अविभाज्य भाग, पाकला ठणकावले

न्यूयॉर्क : जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि भविष्यातही कायमच तसाच राहील, असे भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ठणकावून सांगितले आहे. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत आहे. याशिवाय पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केला आहे.

अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये बोलताना भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानवर टिका केली. त्यांनी म्हटले आहे की, आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहिलं. सध्याच्या जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणं स्वीकार करण्याची गोष्ट नाही.