अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, 12 जण जखमी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, 12 जण जखमी

नवी दिल्ली  : अमेरिकेतील टेनेसी येथील सुपरमार्केटमध्ये एका अज्ञात बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेत हल्लेखोराने स्वतःवरही गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेम्फिसच्या पूर्वेला 50 किलोमीटरवरील उपनगरातील सुपरमार्केट क्रोगर स्टोअरमध्ये हा हल्ला झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडली त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्ल्यानंतर इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.