राज ठाकरे पुणे दौऱ्यावर; महापालिका निवडणुकीसाठी मनसेची जोरात तयारी सुरु

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर; महापालिका निवडणुकीसाठी मनसेची जोरात तयारी सुरु

मुंबईपुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झालं. पुण्यातील नवी पेठेत मनसेचं हे मध्यवर्ती कार्यालय तयार करण्यात आलंय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. तसंच यावेळी मराठा आरक्षणाबाबत अडलंय कुठे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहत असल्याचा टोलाही लगावला आहे.

ओबीसी आरक्षण
ओबीसी आरक्षणाबाबत राज ठाकरे म्हणाले,"मराठा आरक्षणाच्या वेळेला मुंबईला मोर्चा निघाला होता, त्यावेळी सगळेच नेते गेले होते.केंद्र सरकारला मान्य आहे राज्य सरकारला मान्य आहे मग अडवलय कुणीअसा सवाल त्यांनी नेते मंडळींना केलाये. ओबीसी आरक्षण कोर्टात व्यवस्थित मांडलं जात नाही का? सगळ्यांना एका व्यासपीठावर बसवा आणि विचारा असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. आरक्षण प्रकरणी राजकारण आहे का काय आहे हे समाजाने बघितलं पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सध्या माझं इंजिन मीच चालवत असून कोण कुणाचा शत्रू आहे हेच कळत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

खडसेंच्या सीडीची वाट बघतोय
ईडीचा गैरवापर होत आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असं राज म्हणाले. यंत्रणांचा गैरवापर होत आहे. काँग्रेसचं सरकार असतानाही गैरवापर होत होता. भाजपचं सरकार असतानाही होत आहे. यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का? या यंत्रणांचा चुकीचा वापर करून चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केले ते मोकाट आहेत. आणि इतरांवर कारवाई होत आहे. हे चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.