गायींसाठी राज्यात मदत कक्ष स्थापन करण्याच्या योगी सरकारच्या सूचना

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गायींसाठी राज्यात मदत कक्ष स्थापन करण्याच्या योगी सरकारच्या सूचना

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. कुठे ऑक्सिजन तर कुठे रेमडेसिवीर सारख्या जीवनावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील करोना काळात गायींच्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर गोशाळांमध्ये करोनाच्या नियमांच योग्यरित्या पालन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. गोशाळेत गायी आणि अन्य जनावरांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. बेवारसपणे फिरणाऱ्या गायींना गोशाळेत आश्रय देण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. भटक्या जनावरांना वाचवण्यासाठी सरकार अधिक गोशाळा आणि आश्रमांची व्यवस्था करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आत्तापर्यंत ५,२६८ पेक्षा जास्त गोशाळा केंद्रे आहेत. ज्यामध्ये राज्यात तब्बल ५,७३,४१७ गायी आहेत. मुखमंत्री बेसहारा गौ-वंश सहभागिता योजनेंतर्गत उत्तर प्रदेश सरकारने भटक्या जनावरांची काळजी घेणार्यान प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ९०० रुपये आर्थिक मदत देण्याची तरतूद केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हैद्राबादमधल्या नेहरु प्राणीसंग्रहालयातल्या ८ सिंहांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या सिंहांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती.