सायना, श्रीकांतच्या आशा संपुष्टात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सायना, श्रीकांतच्या आशा संपुष्टात

नवी दिल्ल :ऑलिम्पिक पात्रतेच्या स्पर्धा घेण्यास तसेच विद्यमान क्रमवारीत कोणतेही बदल करण्यास जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) नकार दिल्यामुळे किदम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांच्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रतेच्या अंधूकशा आशाही संपुष्टात आल्या आहेत.

करोनामुळे सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द करावी लागल्याने गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला श्रीकांत आणि लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही. ‘‘करोनाच्या वाढत्या संसर्गामुळेबीडब्ल्यूएफने टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रतेच्या कोणत्याही स्पर्धा घेण्यास नकार दिला आहे. आता १५ जून २०२१ पर्यंत क्रमवारीतील अव्वल खेळाडूंनाच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे