स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नागरिक देशाला नव्या उंचीवर नेतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नागरिक देशाला नव्या उंचीवर नेतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आगामी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना विशेष मार्गदर्शन केले.  ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे. आपल्या देशाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला ऑगस्ट महिन्याला सुरुवात झालेली असताना, प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श करतील अशा अनेकानेक घटना घडताना दिसत आहेत. आपल्या देशात विक्रमी संख्येने कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. तसेच वस्तू आणि सेवा कर संकलनाची आकडेवारी देशाच्या मजबूत आर्थिक स्थितीची निदर्शक आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळविलेल्या पदकासाठी पीव्ही सिंधू पात्र होत्याच पण पुरुष आणि महिला हॉकी संघांनी देखील या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आपण बघितली. आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील अशी आशा मला आहे. "