सोलापुरातील नागरिकांमध्ये 80 टक्के अँटीबॉडीज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सोलापुरातील नागरिकांमध्ये 80 टक्के अँटीबॉडीज

सोलापूर :  शहरातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या विषाणूविरुद्ध लढण्याची ताकद किती प्रमाणात आहे, त्यांच्यात सामूहिक प्रतिकारकशक्ती किती टक्के आहे, याची पडताळणी सिरो सर्व्हेतून केली जात आहे. 10 वर्षांवरील विविध वयोगटातील व परिसरातील एकूण एक हजार व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले जात असून, त्यापैकी आठशे नमुन्यांची पडताळणी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांच्यात 80 टक्के अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) माध्यमातून काही जिल्ह्यांमध्ये सिरो सर्व्हे केला जात आहे. त्यामध्ये सोलापूर शहर व ग्रामीणचाही समावेश असून शहरातील एक हजार तर ग्रामीणमधील एक हजार व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. विविध वयोगटातील, विविध परिसरातील व्यक्तींचे रॅन्डमली नमुने घेतले जाणार असून प्रत्येक तालुक्यातून किमान 270 नमुने अपेक्षित आहेत. त्यामध्ये कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस, दुसरा डोस घेतलेल्यांसह लस न घेतलेल्यांचाही समावेश आहे. सध्या शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्र परिसरातील प्रत्येकी 70 जणांचे रक्ताचे नुमने घेतले जात आहेत. आतापर्यंत आठशे नमुने संकलित करून त्यावर डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व जीवरसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून स्टडी केला जात आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत रुग्णवाढ व मृतांमध्ये सोलापूर जिल्हा देशपातळीवर टॉप टेनमध्ये राहिला. आता तिसऱ्या लाटेपूर्वी ठोस उपाययोजनांच्या अनुषंगाने हा सर्व्हे हाती घेण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार