एक संयमी, अभ्यासू आणि दिलदार असा मित्र हरपल्याचे दु:ख : प्रविण दरेकर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एक संयमी, अभ्यासू आणि दिलदार असा मित्र हरपल्याचे दु:ख : प्रविण दरेकर

मुंबई : राजीव सातव यांच्या निधनानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. राजकीय पटलावर फार मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील तरुण नेता, काँग्रेसच्या सर्वोच्च वर्तुळात ज्याने स्वतःच स्थान निर्माण केलं होतं. ज्याने गांधी घराण्याचे विश्वास संपादन केला होता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी त्यांची मैत्री झाली असे गांधी कुटुंबाचे निष्ठावान नेते काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी हे सर्व आपल्या कर्तुत्वातून, स्वभावातून निर्माण केलं असल्याचे दरेकर यांनी सांगितले.  दरेकर म्हणाले, राजीव सातव आणि मी दोघांनी विधानसभेच्या सभागृहात एकत्रित काम केलं आहे. सच्चा दिलदार असा मित्र म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. चिकित्सक, अभ्यासू कोणतीही माहिती घेण्यात आवड असणारे अशी त्यांची ओळख आहे. कोणताही प्रयोग समजून घेत आपल्या पक्षासाठी काम करणारे दिल्लीमधील गांधी कुटुंबाचे निष्ठावान नेते, महाराष्ट्रामधील राजकारणातील तरुण चेहरा लोप पावला आहे. निश्चितपणे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झाले आहे. एक संयमी, अभ्यासू आणि दिलदार असा मित्र हरपल्याचे मला मनस्वी दुःख असल्याचे सांगत दरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.