सिंधुदुर्गवासियांनो उद्योजक व्हा; नारायण राणे यांचे आवाहन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सिंधुदुर्गवासियांनो उद्योजक व्हा; नारायण राणे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग : जनआशीर्वाद यात्रा ही संकल्पना पंतप्रधान मोदी यांची आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनुसार राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. मागील 10 दिवस मुंबईसह पूर्ण कोकणात जनतेचे आशीर्वाद घेत आहे. रात्री 1 वाजेपर्यंत जनता जन आशीर्वाद यात्रेसाठी थांबलेले दिसून आले. रेकॉर्ड ब्रेक असा प्रतिसाद जनतेने मला दिला. उद्योजक बनवून दरडोई उत्पन वाढविणारे, देशाचा जीडीपी वाढवणारे माझ्याकडे केंद्रीय उद्योग खाते आहे. मला साथ देण्यासाठी सिंधुदुर्गवासियानो उद्योजक व्हा असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी विधनापरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जि प अध्यक्षा संजना सावंत, राजन तेली उपस्थित होते. जनआशीर्वाद यात्रेत अपशकुन करत मांजर आडवे गेले. आधी स्वतःच्या मुलांचे गुण बघा. संजय राऊतमुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे. सामना आणि संजय राऊत ची प्रतिमा बौद्धिक लोकांमध्ये मलिन झाली आहे. माझ्या मुलांची बरोबरी करू नको. माझे दोन्ही मुलगे उच्चशिक्षित आहेत. माझ्यावर प्रेम करणारे माझे मुलगे असून माझ्या प्रतिमा जपण्याची काळजी ते घेत आहेत. राऊत तुमची लेखणी थांबवा अन्यथा आम्हीही आमचा प्रहार करू असा निर्वाणीचा इशारा केंद्रीयमंत्री राणे यांनी दिला. अनिल परब यांचा बुरखा शेवटी माध्यमानीच फाडला. पोलिसांना माझ्या अटकेचे आदेश जणू राष्ट्रपतीच्या आवेशात आदेश देत होता. माझ्यावर वाईट बोलल्याशिवाय सेनेत पद मिळत नाही. म्हणून माझ्यावर सेनेवाले टीका करतात. याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गातील खासदार अशी नामोल्लेख न करता विनायक राऊत यांच्यावर टीका केली. जेव्हा बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता. शरद पवार यांनी अज्ञातस्थळी जाण्यास सांगितले होते. आतंकवादी बाळासाहेबांच्या जीवावर उठले होते. बाळासाहेबांनी मला बोलावून संरक्षण देण्याची सूचना केली होती. मी माझी टीम घेऊन बाळासाहेबांना रात्रंदिवस जागून संरक्षण दिले. मातोश्रीबाहेर रात्रोरात्र जागून आम्ही पहारा दिला आहे. याची आठवण करून देत आता बस करा असा इशाराही राणे यांनी शिवसेनेला दिला.