निर्बंध झुगारत मनसेने ठाणे, मुंबईत फोडल्या दहीहंड्या

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

निर्बंध झुगारत मनसेने ठाणे, मुंबईत फोडल्या दहीहंड्या

मुंबई, : कोरोनामुळे राज्यात दहीहंडीला परवानगी नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे, मुंबईत ठिकठिकाणी रात्री,पहाटेच्या सुमारास दहीहंड्या फो़डल्या. विशेष म्हणजे, मनसेने राज्याचे पर्यटन मंत्री व वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत दहीहंडी फोडून दाखवली.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारत या उत्सवावर निर्बंध घातली आहेत. मात्र, मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली. कुठे तीन थरांची तर कुठे चार तर कुठे पाच थर लावून मनसैनिकांनीच दहीहंडी फोडत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत उत्सव साजरा केला. मात्र, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी नांदगावकर यांच्यासह मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी साजरी करणाऱ्या काही मनसेसैनिकांसह गोविंदांना ताब्यात घेतल्याचे समजते.