97 दिवसांनंतर सोने 48,000 पार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

97 दिवसांनंतर सोने 48,000 पार

देशांतर्गत बाजारात ९७ दिवसांनंतर शुद्ध सोन्याची(२४ कॅरेट) किंमत सोमवारी सकाळच्या व्यवसायात ४८,००० रु. प्रति १० ग्रॅम पार झाली. मुंबईच्या सराफा बाजारात ही ४२४ रु.वाढून ४८,१८१ रु. प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचली. याआधी या वर्षी ९ फेब्रुवारीला ४८,०४५ रु. होती. यानंतर ही घटून ३१ मार्चपर्यंत ४४,१९० रु. खाली आली होती. दागिन्याचे सोने(२२ कॅरेट) सोमवारी ३८९ रु. महाग होऊन ४४,००० रुपयांवर पोहोचले. किंमत ४४,१३४ रु. प्रति १० ग्रॅम झाली. याआधी ९ फेब्रुवारीला हे ४४,००९ रु. होते. हा ३१ मार्चपर्यंत घटून ४०,४७८ रु. प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आला. मात्र, सोमवारी सायंकाळी व्यवसाय समाप्तीवर शुद्ध सोन्याची किंमत ३८९ रु. वाढून ४८,१४६ रु. प्रति १० ग्रॅम राहिली. याच पद्धतीने दागिन्याचे सोने ३७५ रु. महाग झाले. याची किंमत ४४,१०२ रु. प्रति १० ग्रॅम राहिली.

सराफा तज्ज्ञांनुसार, इस्रायल-हमास यांच्यात सुरू असलेला भू-राजकीय तणाव वाढण्याचा धोका आहे. यासोबत भारतात आगामी काळात अर्थव्यवस्था खुली होण्याच्या आशेवर सराफांकडून सोन्याची मागणी वाढली आहे. याशिवाय बाँड यील्ड कमकुवत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत तीन महिन्यांच्या उंचीवर पोहोचली आहे. सोमवारी ही ०.३१% वाढीसह १,८४९.३२ डॉलर प्रति औंसवर होती. याआधी ८ फेब्रुवारीला ही १,८२९.८७ डॉलर प्रति औंस होती.