शमीच्या कव्हर ड्राईव्हमुळे थोडक्यात हुकली जेमिसनची हॅट्रिक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शमीच्या कव्हर ड्राईव्हमुळे थोडक्यात हुकली जेमिसनची हॅट्रिक

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, साउथॅम्प्टनच्या रोज बाउल मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाचा फलंदाजी क्रम उध्वस्त करण्यात काइल जेमिसनने महत्वाची भूमिका बजावली होती.त्याने अवघ्या ३१ धावा खर्च करत सर्वाधिक गडी बाद केले. तसेच या डावात त्याला आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी होती. परंतु मोहम्मद शमी मुळे त्याला हा विक्रम करता आला नाही.

काइल जेमिसनने या डावात आपल्या स्विंग आणि वेगवान गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले होते. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा यांना बाद केले होतेया दरम्यान त्याला हॅटट्रिक करण्याचीही संधी मिळाली होती. परंतु मोहम्मद शमीमुळे त्याला हॅटट्रिक पूर्ण करता आली नाही. (Mohammad shami broke jamieson's dream dream of taking a hattrick in WTC final by playing cover drive)

शमी मुळे काइल जेमिसन हा मोठा विक्रम करण्यापासून राहिला वंचित

तर झाले असे की, भारतीय संघ फलंदाजी करत असताना ९२ वे षटक काइल जेमिसन टाकत होता. याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने ईशांत शर्माला माघारी धाडले तर पाचव्या चेंडूवर त्याने जसप्रीत बुमराहला बाद केले होते. पुढील चेंडूवर मोहम्मद शमीला बाद करून त्याच्याकडे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅट्रिक घेण्याची संधी होती. परंतु मोहम्मद शमीने शेवटच्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह खेळत चौकार लगावला. त्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहून हसताना दिसून आले होते. आयसीसीनेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर दोघांचा हसत असतानाचा फोटो शेअर केला आहे.