'भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले, तरी सत्तेचा सोपान करता येणार नाही'

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले, तरी सत्तेचा सोपान करता येणार नाही'

मुंबई - राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून विरोधी पक्ष भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची महाविकास आघाडी सरकारने केलेली तयारी बघता अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अन् गदारोळाचेच वातावरण असेल, असे चित्र आहे. त्यातच, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर सरसंधान साधले आहे. ईडीकडून होत असलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. Maharashtra Vidhan Sabha session of Maharashtra Government, power cannot be stepped up', Sanjay Raut on BJP

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहेदोन दिवसांचे अधिवेशन घेऊन सरकारने लोकशाहीला कुलूप लावल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, या सरकारविरुद्ध रस्त्यावरचीही लढाई लढू असेही ते म्हणाले. तर केवळ गोंधळातच अधिवेशन संपावे असे विरोधकांना वाटते. महाराष्ट्राच्या हिताची एवढीच काळजी असेल तर अधिवेशन शांततेत होऊ द्या असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केले. त्यानंतर, आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर बोचरी टीकाही करण्यात आली आहे.

सत्तेचा सोपान पार करता येणार नाही

अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करून महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. या भोपळय़ांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही . भाजपचे ' उपरे ' पुढारी प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोटय़वधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. 'ईडी'ने याप्रकरणी डोळे मिटून दूध पिण्याचे ठरवले असेल तर राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाने तत्काळ कारवाई करावी. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करणाऱया विरोधी पक्षाच्या या उद्योगांचाही भंडाफोड होणे गरजेचे आहे.

आरक्षणाचा प्रश्न केंद्रातच सोडवला जाईल