शेतकरी आंदोलनामुळे गावे बनली हॉटस्पॉट –मनोहरलाल खट्टर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शेतकरी आंदोलनामुळे गावे बनली हॉटस्पॉट –मनोहरलाल खट्टर

चंदीगड : देशभरात कोरोना साथरोगाचा प्रकोप सुरू असताना दिल्लीच्या टिकरी आणि सिंघू सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांमुळे दिल्ली सीमेवरील हरियाणाची काही गावे कोरोना हॉटस्पॉट बनल्याचा दावा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलाय. 

यासंदर्भात खट्टर म्हणाले की, महिन्याभरापूर्वी शेतकरी नेत्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा आंदोलन करता येईल, असा सल्ला देखील दिला होता. मात्र आता या आंदोलनामुळे काही गावे की करोनाचा हॉस्पॉट झाली आहेत. येथील काही गावकरी या आंदोलनाच्या ठिकाणी सतत ये जा करत असल्याने हा प्रकार घडल्याचे खट्टर यांनी सांगितले. दरम्यान हरियाणात मागील तीन दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. आज एक लाख सात हजार सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था सध्या जेवढी गरज आहे त्यासाठी पुरेशी असल्याचे खट्टर यांनी सांगितले.