सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यावर टप्प्याटप्प्याने निर्णय - आयुक्त इक्बाल सिंह चहल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यावर टप्प्याटप्प्याने निर्णय - आयुक्त इक्बाल सिंह चहल

मुंबई : मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट आणखी घसरला आहे. आठवडाभरात पॉझिटिव्हिटी रेट 3.79 टक्के इतका आहे. मुंबईतील संसर्गाचा दर चार टक्क्यांच्याही खाली आला आहे. ब्रेक चेनच्या नियमांतर्गत 'अनलॉक'च्या प्रक्रियेत मुंबई शहर आता पहिल्या स्तरात आले आहे. असे असले तरी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यावर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येणार आल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

 

आधी महिलांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात येईल आणि त्यानंतर इतरांचा विचार केला जाईल. यामुळे लोकलमध्ये गर्दी होणार नाही. मात्र, मुंबई दुसऱ्या टप्प्यात येण्यासाठी परिस्थितीत आणखी सुधारणा होण्याची गरज आहे. त्यानंतरच लोकल सेवेसंदर्भातले निर्णय घेण्यात येतील, असेही चहल यांनी स्पष्ट केले.