पंतप्रधानांनी केले देशवासियांचे अभिष्टचिंतन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधानांनी केले देशवासियांचे अभिष्टचिंतन

नवी दिल्ली : अक्षय तृतीया, परशुराम जयंती आणि रमजान ईदच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर विजय मिळावा असे म्हंटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर 3 वेगवेगळे संदेश जारी करून अक्षय तृतीया , परशुराम जयंती आणि रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात. त्यापैकी पहिल्या ट्वीटमध्ये मोदी म्हणाले की, शुभारंभासाठी उत्तम मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला आमच्या कोरोनामुक्तीच्या संकल्पाला बळ मिळो. आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये मोदींनी परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुस्लीमांच्या ईद-उल-फितर सणाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की, सर्वांच्या उत्तर आरोग्यासाठी प्रार्थना करतो आणि सामूहिक प्रयत्नातून आपण जागतिक साथरोगाचा पराभव करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मानव कल्याणाच्या दिशेने काम व्हावे असा मनोदय त्यांनी व्यकत केलाय.