केंद्र सरकारद्वारे 23 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा प्रदान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

केंद्र सरकारद्वारे 23 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा प्रदान

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 23  कोटीपेक्षा जास्त लसींच्या मात्रा  (23,11,68,480) विनामूल्य राज्य निहाय वितरण आणि राज्याकडून  थेट खरेदी या दोन्ही  प्रकारात उपलब्ध करून दिल्या आहेत.

यापैकी  वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 21,22,38,652 लसींच्या मात्रा ( सकाळी 8 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार) वापरल्या गेल्या आहेत. 

1.75 कोटींपेक्षा जास्त कोविड लसींच्या मात्रा   (1,75,48,648) अद्याप राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. याशिवाय सरकार  2.73 लाख (2,73,970) हून अधिक लसींच्या मात्रा उपलब्ध करण्याच्या  प्रक्रियेत असून पुढील 3 दिवसांत त्या  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील.

देशभरातील लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणूनकेंद्र सरकारराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींच्या मात्रा विनामूल्य  उपलब्ध करून सहाय्य करत आहे. याव्यतिरिक्तकेंद्र  सरकार हे  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या मात्रांची  थेट खरेदी करण्याची सुविधाही सुलभ करत आहे. लसीकरण ,चाचणीमागोवाउपचार आणि कोविड योग्य वर्तन यासह या महामारीच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक रणनीतीचा अविभाज्य स्तंभ आहेत .

कोविड -19 लसीकरणाच्या व्यापक आणि गतिशील अशा तिसऱ्या टप्प्याच्या रणनीतीची अंमलबजावणी दिनांक 1 मे पासून सुरू झाली आहे. या धोरणानुसारप्रत्येक महिन्यात कोणत्याही उत्पादकाच्या केंद्रीय औषधी प्रयोगशाळेने  (सीडीएल) मान्यता दिलेल्या एकूण लसींच्या मात्रांपैकी  50% मात्रा  सरकारकडून खरेदी केल्या जातील. केंद्र सरकार पूर्वीप्रमाणे  या लसींच्या मात्रा राज्य सरकारांना  पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करुन देईल. देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा  नूतन- तिसरा टप्पा 1 मे पासून सुरु झालेला  आहे. अठरा  वर्षापेक्षा जास्त वयाच्या 18-44 सर्व नागरिकांना लस उपलब्ध केली जात आहे. याद्वारे मोठ्या आणि व्यापक स्वरूपात लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. पात्र नागरिक या लसीकरणासाठी http://Cowin.gov.in. या संकेतस्थळावर डिजिटल नोंदणी करू शकतात.