पंतप्रधानांनी केले के. जे. अल्फान्स यांचे कौतुक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधानांनी केले के. जे. अल्फान्स यांचे कौतुक

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत माजी केंद्रीय मंत्री, माजी प्रशासकीय अधिकारी आणि खासदार के जे अल्फान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली आणि आपले पुस्तक ‘ एक्सलरेटींग इंडिया : 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट’ ची प्रत भेटस्वरूप दिली.
के जे अल्फान्स यांचे कौतुक करताना ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " माझे मौल्यवान सहकारी के जे अल्फान्स यांनी ‘ एक्सलरेटींग इंडिया : 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट’ या पुस्तकाद्वारे भारताच्या विविधांगी सुधारणांचा साहित्यिक समावेश आणि एकत्रिकरण करण्याचे अद्भुत कार्य केले आहे. या पुस्तकाची प्रत प्राप्त झाल्याने आनंद झाला. "
‘ एक्सलरेटींग इंडिया : 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट’ या पुस्तकाचे के जे अल्फान्स यांनी संकलन आणि संपादन केले आहे. काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडूंनी या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. जवळपास 25 सेवारत आणि माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या पुस्तकात आपले विचार आणि अनुभव मांडले आहेत . मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या कार्यकाळाचे हे शब्दांकन आहे. सरकारच्या योजनांचे कार्य कसे होते हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचकांना उपयोगी ठरेल.