पुणे जिल्ह्यात 'झिका'नंतर आता कोरोना 'डेल्टा प्लस'चे दोन रुग्ण आढळले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुणे जिल्ह्यात 'झिका'नंतर आता कोरोना 'डेल्टा प्लस'चे दोन रुग्ण आढळले

पुणे : दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका विषाणूची एका ५० वर्षीय महिलेला लागण झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान आता नीरा (ता. पुरंदर) येथे कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोन रुग्णांना या विषाणूची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. यावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात काल कोरोनाच्या डेल्टा प्लस या प्रकारातील विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांनी दिली आहे. यामध्ये नीरा जवळच्या थोपटेवाडी येथील एका १४ वर्षाच्या मुलाला तर एका ४८ वर्षीय व्यक्तीला या विषाणूची बाधा झाली आहे. १४ वर्षीय मुलगा गेली आठ दिवस कोरोना बाधित असुन त्याच्या आई वडिलांना ही कोरोनाची बाधा झाली होती पण त्यांच्या डेल्टा प्लसचे कोणतेही विषाणू आढळून आले नाहीत. ४८ वर्षीय महिला गेली १२ दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाल्या होत्या. दोन्ही रुग्णांची तब्येत चांगली असून लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार