वांद्र्यात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वांद्र्यात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

मुंबई : वांद्रे पूर्व परिसरातील बेहराम पाडा भागात असलेल्या एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांना वांद्रे पूर्वमधील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बेहराम पाडातील चार मजली रज्जाक चाळ आहे. या चार मजली इमारतीत छताचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी घटनास्थळाकडे धा

घेतली.

या दुर्घटनेत मृत्यू झालेली व्यक्ती मूळची बिहारची होती. तर, एका महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून तिला टाके पडले आहेत. इतर जण किरकोळ जखमी झाले आहेत. इमारत कोसळल्याने मोठा माती आणि विटांचा ढिगारा पडला असून तो हटवण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडून करण्यात आल्याची माहिती . सिद्धीकी यांनी दिली.