राज-उद्धव एकत्र येणार का?; संजय राऊतांनी लगावला टोला; म्हणाले…

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज-उद्धव एकत्र येणार का?; संजय राऊतांनी लगावला टोला; म्हणाले…

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी भावना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक बोलून दाखवली जाते. पण दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही, याबद्दल कुणीही खात्री सांगू शकत नाही. ‘लोकसत्ताच्यादृष्टीआणिकोनकार्यक्रमात राज ठाकरे यांनाच याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी परमेश्वला ठाऊक असं उत्तर दिलं होतं. राज यांनी दिलेल्या उत्तरावरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना राज-उद्धव एकत्र येणार का? यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले,”राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा सदस्य नसतो. तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं,” असं म्हणत राऊत यांनी राज यांना टोला लगावला.

राज ठाकरे काय म्हणाले होते…?

दृष्टीआणिकोनही वेबमालालोकसत्ताच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती. या वेबिनारमध्ये जून रोजी महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संवाद यांनी साधला. त्यावेळी राज यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवतपरमेश्वरालाच ठाऊकअसं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा प्रश्न गिरीश कुबेर यांनी केला. तेव्हा, “म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो,” असं उत्तर राज यांनी दिलं.