इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी कंगना रणौत सज्ज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी कंगना रणौत सज्ज

अभिनेत्री कंगना रणौत सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. येत्या काळातधाकडतसचंतेजससह अनेक सिनेमांमध्ये कंगना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकणार आहे. प्रत्येक भूमिकेसाठी कंगना कायमच मोठी मेहनत घेताना दिसते. यातच आता कंगना लवकरच इंदिरा गांधी यांच्यावर आधारित एका पॉलिटिकल ड्रामात झळकणार अशा चर्चा होत्या. या सिनेमाबद्दल आता कंगनाने एक अपडेट दिलंय.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात कंगनाने इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी तयारी सुरू झाल्याचं स्पष्ट केलंय. प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयात इंदिरा गांधी यांच्या लूकसाठी कशाप्रकारे बॉडी स्कॅनिंग केलं जातं हे तिने या फोटोच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे.

त्यामुळे येत्या काळात आता थलायवीनंतर कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पुन्हा एकदा एका राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालीय. कॅप्शनमध्ये कंगना म्हणाली, “प्रत्येक भूमिका म्हणजे नव्या प्रवासाची सुंदर सुरूवात असते. आज आम्ही #Emergency #Indira च्या प्रवासाला बॉडी आणि फेस स्कॅनिंगने सुरुवात केली आहे ज्यामुळे अगदी योग्य लूक साधता येईल.”असं ती म्हणाली.