मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपले, पुढील पाच दिवस धोक्याचे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपले, पुढील पाच दिवस धोक्याचे

मुंबई :  मागील काही दिवस मुसळधार पावसाने राज्याला झोडपले आहे. पुढील पाच दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झालेला दिसून येत आहे. अनेक रेल्वे गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत. कसारा घाटात दरड कोसळल्याने माती रेल्वे रूळावर जमा झाल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अशाच प्रकारे लोणावळा घाटातील वाहतूकही प्रभावित झाली होती. उंबरमाळी स्थानकात रूळांवर पाणी आल्याने व रूळाखालील माती वाहून गेल्याने या भागातील वाहतूकही बंद होती. रात्री मुसळधार पावसामुळे अमरावती एक्सप्रेस खर्डी स्थानकात थांबवण्यात आली होती, ती सकाळी मुंबईकडे रवाना करण्यात आली. तसेच सिद्धेश्वर एक्सप्रेसही थांबवण्यात आली होती.
रायगड जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसामुळे महाड एमआयडीसी परिसरातील कांबळे फाटा ते हायकलदरम्यान पाणी साचले आहे. तर कर्जत तालुक्यातही अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कर्जत-दहिवलीला जोडणाऱ्या उल्हास नदीच्या पुलावरुन पाणी गेल्यामुळे नागरिकांच्या वाहनांचे फार नुकसान झाले. दहिवलीतल्या गणेशघाट परिसरातही पाणी साचले. कडाव-चांदई मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर, मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर तर नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असे सांगण्यात येत आहे.