RCBकडून खेळलेल्या अष्टपैलू क्रिकेटपटूनं सोडला देश, आता ‘नामिबिया’कडून खेळणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

RCBकडून खेळलेल्या अष्टपैलू क्रिकेटपटूनं सोडला देश, आता ‘नामिबिया’कडून खेळणार

आयसीसी टी-२० विश्वचषक यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात यूएईमध्ये खेळला जाणार आहे. यासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. आयपीएल स्पर्धाही विश्वचषकापूर्वी होणार आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडूंना सरावाची चांगली संधी मिळेल.

टी-२० विश्वचषकापूर्वी अनेक खेळाडू आपला देश सोडून दुसऱ्या देशात सामील होत आहेत. भारताचा १९ वर्षांखालील विश्वचषकविजेता कर्णधार उन्मुक्त चंदनेही भारतीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता अमेरिकन क्रिकेट संघाकडून खेळताना दिसणार आहे. या यादीतील पुढील नाव दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळलेल्या डेव्हिड वीजचे आहे. आगामी टी-२० विश्वचषकात तो नामिबियाकडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

वीजच्या वडिलांचा जन्म नामिबियामध्ये झाला होता आणि त्याचे तेथे वडिलोपार्जित घरही आहे. २०१७मध्ये डेव्हिड वीजने कोल्पॅक करार केला, त्यानंतर तो ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला. या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळू शकला नाही, म्हणून त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून डेव्हिड वीज खेळला होता. सध्या तो द हंड्रेड्समध्ये खेळत आहे.