पंकजा मुंडेंकडून पक्ष कार्यकर्त्यांचे आभार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंकजा मुंडेंकडून पक्ष कार्यकर्त्यांचे आभार

मुंबई  : विविध माध्यमांद्वारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्री, पक्षातील वरिष्ठ, सहकारी, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले.
ट्वीटर द्वारे पंकजा मुंडे म्हणाल्या, " आभार!! दिवसाची सुरुवात अमित भाई च्या फोन ने तर दिवसभर अनेक नेत्यांच्या,केंद्रीय राज्यातील मंत्री सहकार्यांच्या ,दोन्ही छत्रपतींच्या,राज्यपालांच्या आणि तुमच्या सर्वांच्या मोलाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या निमित्त इतके प्रेम आणि आशीर्वादाने माझी ऊर्जा द्विगुणित झाली..मी ऋणी आहे" अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिलेत.