पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरण : मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरण : मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

मुंबई, १३ ऑगस्ट (हिं.स.) : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने अधिक चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीमध्ये मुंबई गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हा तपास केला जाणार आहे. त्यांच्यासोबत मदतीसाठी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक दर्जाचे अधिकारी असणार आहेत. या पथकाचे मुख्य काम वरिष्ठांना या केस संदर्भात सगळी माहिती देणे हे आहे.

या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन फिर्यादी किंवा तक्रारदार समोर येत आहेत. तसेच आता बॉलिवूडमधील अजून काही मोठी नावे पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा योग्यरित्या तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

पॉर्न फिल्म रॅकेट संदर्भात मुंबई पोलिसांच्या अखत्यारीत जितके गुन्हे दाखल आहेत. त्या प्रत्येक गुन्ह्याचा तपास या एसआयटीमार्फत केला जाणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मालवणी पोलीस ठाण्यात सुद्धा एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामध्ये दिग्दर्शक अभिजीत बोंबलेला अटक करण्यात आली आहे. नंतर मालमत्ता विभागाकडे तपासासाठी हे प्रकरण वर्ग करण्यात आले होते. त्याचा तपाससुद्धा एसआयटीकडून केला जाणार आहे.