लॉकडाऊनचा अतिरेक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लॉकडाऊनचा अतिरेक

राज्य सरकारने लॉकडाऊन उठवायला अजूनही नकारघंटाच वाजवली आहे आणि यामुळे सामान्य माणसाची
सहनशक्ति आता संपायला आली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही हाच मुद्दा मांडला आहे. त्याचबरोबर माजी
मुख्यमंत्रि आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्याना पत्र लिहून आता लॉकडाऊन उठवायची वेळ
आली आहे, असे म्हटले आहे. तर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही लॉकडाऊन उठवण्याची मागणी अनेक
मंत्र्यांनी केल्याचे समोर आले आहे. केवळ मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे यांचाच लॉकडाऊन उठवायल विरोध आहे, असे
दिसते आहे. तशी निदान लोकभावना तरी तयार झाली आहे. खरे तर ठाकरेंना ही भूमिका खूप महागात पडू शकते.
लॉकडाऊन कितीही सरकारला आवडत असला तरीही एका मर्यादेपलिकडे कोणतीही गोष्ट केली तर तिचे हसू होते
आणि त्याचा फटकाही बसतो. लॉकडाऊन सगळीकडे उठवले आहे आणि केवळ महाराष्ट्रातच ती लागू आहे. हे
राज्यकर्ता म्हणून चांगले लक्षण नाहि. इतर मंत्र्यानी लॉकडाऊन उठवण्याची मागणी केल आहे कारण त्यांना
निवडणुका लढवायच्या आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांसारखे विधान परिषदेवर निवडून येऊन चालणार नाहि. त्यामुळे हे मंत्रि लॉकडाऊन उठवण्यासाठी आग्रही असतील तर त्यांची काही चूक नाहि. शेवटी त्यांना मतदारांपुढे जायचे आहे. सामान्य माणसे आणि दुकानदार आताच इतके मेटाकुटीला आले आहेत की त्यांच्या जगण्याचे वांधे झाले आहेत. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे परिस्थितीचा कडेलोट झाला तर त्यात ठाकरे सरकार त्या संतापाच्या आगीत भस्म होईल. पण सरकार वाचवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या हालांकडे सहानुभूतीने पाहिले पाहिजे. लॉकडाऊन असल्याने अनेकांना कामावर जाता येत नाहि. लोकल बंद असल्याने ज्यांना कामावर जावे लागते त्यांचे हाल बेस्ट
बसमध्ये कुत्राही खात नाहि. लोकल बंद असताना बेस्ट गच्च भरून जात आहेत. त्यातून कोरोना विषाणु पसरत नाहि
का, हा प्रश्न सुरूवातीपासून विचारला जात होता. या प्रश्नाला महाविकास आघाडीकडे उत्तर नसल्याने सार्यांनी
सोयिस्कर मौन पाळले होते. पण आता शिवसेना सोडली तर इतर पक्षांना या प्रश्नाची धग जाणवू लागली आहे.
आपले भवितव्य त्यांना स्पष्ट दिसू लागले आहे. त्यांना निवडणुकीत हरण्याची भीती वाटू लागली आहे. कारण
लॉकडाऊन हा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा रहाणार आहे. याची जाणीव केवळ ठाकरे सोडले तर सर्वांना आहे.
लॉकडाऊन हे कोणत्याही सरकारला आवडतच असते. केंद्रातील मोदी सरकारलाही कोरोना वेगळ्या अर्थाने फळलाच
आहे. ठाकरे आणि मोदी यांची याविषयावर भूमिका एकच दिसते आहे. दोघांनाही विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे
जायचे नाहि. त्यामुळे त्यांना लॉकडाऊन हा सोयिस्कर आहे. म्हणून कोरोनाच्या तिसर्या लाटेची खरीखोटी भीती
दाखवून लॉकडाऊन वाढवण्याचा मोदी आणि ठाकरे हे दोघेही प्रयत्न करत आहेत. देशाची आणि राज्याची
अर्थव्यवस्था आता कडेलोटाला आली आहे. पण दोघांनाही अर्थव्यवस्था वाचवण्यापेक्षा स्वतःचे सरकार वाचवण्याची
पडली आहे, अशी लोकभावना तयार झाली आहे. खरेतर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
राज्यातील पन्नास नामवंत विचारवंतांनी महाविकास सरकारला खुले पत्र लिहून लॉकडाऊन उठवण्याची विनंती
केली आहे. त्यांनी जे प्रश्न मांडले आहेत ते खरोखरच काळजी वाढवणारे आहेत. लहान मुलांचे मानसिक आरोग्य
सतत घरात कोंडून रहाण्यामुळे बिघडले आहे. आपण मनोरूग्णांची पिढी घ़डवणार आहोत का, हा प्रश्न सर्वांनी
स्वतःलाच विचारला पाहिजे. शाळा सुरू होणे फार आवश्यक आहे. कारण सतत घरात राहून मुले मुली काही कर्तृत्व दाखवाचचे असते, हेच विसरून गेली आहेत. राज्यसरकारला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन आणि निर्बध यापलिकडे काही सुचत नाहि, हे राज ठाकरे यांचे म्हणणे बरोबर असल्याचे लोकांनाही वाटते. मुळात लॉकडाऊनमुळे कोरोना आटोक्यात आल्याचा एकही वैज्ञानिक पुरावा नाहि. मुळात मोदींनी नको असताना लॉकडाऊन लावला आणि देशाचे हाल केले. अर्थव्यवस्था बिघडवली, असा आरोप लोकच करत आहेत. त्यात राज्य सरकारांनाही लॉकडाऊन हा विरोधकांना गप्प करण्याचा चांगला मार्ग आहे, हे लक्षात आले. त्यामुळे आता सरकारला आता याची मजा वाटू लागली आहे. त्यामुळे हा उपाय सरकारला सोडवत नाहित. हे असेच चालू राहिले तर लोकच एक दिवस रस्त्यावर येतील आणि सरकारला तो मोठाच धोका असेल. राज्य सरकारने आता लोकांच्या सहनशक्तिचा अंत पाहू नये. सारे लोक म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करू नये. कोणताही अतिरेक अनर्थाचे कारण बनत असतो.