रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणाची सर्व माहिती मागविणार - डॉ. निलम गोऱ्हे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रेमडेसिवीर  काळाबाजार  प्रकरणाची  सर्व  माहिती  मागविणार - डॉ. निलम गोऱ्हे

बुलडाणा : कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना औषधे सुविधांसाठी ओढताण करावी लागत असतांना काही ठिकाणी रेमडेसिवीर काळाबाजारीच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बुलडाणा खामगाव येथील तक्रारी प्राप्त झाल्या असून या बाबतची सर्व माहिती मागविणार असून रुग्णांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास शिवसेना प्रवक्ता तथा विधानसभा उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहेरेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी नांदुरा येथील गैबीनगर परिसरात धाड टाकून एलसीबीने तीन आरोपींना अटक केली होती. तर बुलडाण्यात डॉ. लद्धड डॉ. मेहेत्रे हॉस्पिटलमधील 3 कर्मचाऱ्यांचा बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीचा धक्कादायक प्रकार राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यातच समोर आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी तपास  संथगतीने  सुरु असून मुख्य सुत्रधार अद्यापही मोकाटच असल्याची उघड चर्चा आहे.

कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या संकटकाळात काही रुग्णालयात अवाजवी बील वसूली केली जात आहे. सर्व रुग्णालयांना कायदे लागू आहे. ८० टक्के बेड हे कोविड साठी राखीव ठेवण्याचा आदेश आहे. परंतू शहरी ग्रामिण भागात रुग्णांना कोणती औषध दिल्या जात आहे याची माहीतीच दिली जात नाही. रेमडेसिवीर चढ्या भावाने विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. बुलडाणा खामगाव येथील काळाबाजार प्रकरणाची स्वतः लक्ष घालून माहिती मागविणार आहे. संबाधित रुग्णांना निश्चितच न्याय मिळवून देण्याचा दिलासादायी प्रयत्न करणार आहे, असेही गोऱ्हे म्हणाल्या