राज्यात ११ हजार जणांचे लसीकरण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यात ११ हजार जणांचे लसीकरण

मुंबई : राज्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून सायंकाळी वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ जणांचे लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले. पुण्यात सर्वाधिक १३१६ जणांना लस मिळाली  तर गडचिरोलीत ८३ जणांनी लस घेतली.

देशात मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के ली होती. मात्र पुरेशा प्रमाणात लस नसताना ही लसीकरण मोहीम कशी सुरू होणार याबाबत अनिश्चितता होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू करत असल्याचे जाहीर के ले. राज्याला मे महिन्यासाठी लशीच्या अवघ्या १८ लाख मात्रा केंद्र्र सरकारने मंजूर के ल्या असून त्या कधी मिळणार याबाबत अनिश्चितता आहे. तूर्तास लाख लशी राज्याला मिळाल्याने राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी शनिवारी २६ जिल्ह्यांत ठरावीक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यात सायंकाळी वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ जणांचे लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले. उर्वरित जिल्ह्यांमध्ये रविवार मेपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत १००४ जणांना, ठाणे ६११, परभणीत ६४६ जणांना लस मिळाली. यवतमाळमध्ये ९० जणांना लस मिळाली.

मुंबईतील पाच केंद्रांवर लसीकरण

मुंबई: पालिकेच्या नायर, वांद्रे-कुर्ला संकुलातील(बीकेसी) करोना केंद्र, कूपर, सेव्हनहिल्स आणि राजावाडी या पाच केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील सुमारे एक हजार जणांचे शनिवारी लसीकरण करण्यात आले. नोंदणी करून वेळेचा संदेश मिळालेल्यांचे लसीकरण शनिवारी करण्यात येईल, असे सांगूनही वेळ दिलेल्यांनीही लस घेण्यासाठी पालिकेच्या केंद्रांवर गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला आवरताना नाकीनऊ आले.मुंबईत लसीकरण कार्यकमाचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बीके सी लसीकरण केंद्रावर के ले.