राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर कार्यक्रमात 32 प्रकल्पांचा समावेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर कार्यक्रमात 32 प्रकल्पांचा समावेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर कार्यक्रमाचा भाग म्हणून देशभरात 32 प्रकल्पांचा समावेश असलेले 11 औद्योगिक कॉरिडॉर विकसित करण्याला मान्यता दिली आहे. यापैकी काही प्रकल्प संकल्पनेच्या/ विकासाच्या/ अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील चार औद्योगिक मार्गिकांचा समावेश आहे.
दिल्ली- मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत 10 प्रकल्पांचा समावेश असून या मार्गिकेच्या निर्मितीचे काम सुरू आहे. हैदराबाद नागपूर औद्योगिक मार्गिकेअंतर्गत एक प्रकल्प असून प्रकल्प विकासाचे काम सुरू झाले आहे. त्याच प्रकारे बंगळूरु- मुंबई या मार्गिकेसाठी देखील दोन प्रकल्पांच्या विकासाचे काम सुरू आहे. तर दिल्ली नागपूर औद्योगिक कॉरिडॉर संकल्पना स्थितीमध्ये आहे.

औद्योगिक उत्पादकतेचा विस्तार करणे, रोजगारसंधींमध्ये वाढ करणे, नव्या आणि वाढत चाललेल्या मनुष्यबळाला औद्योगिक क्षेत्राशी संलग्न उत्तम पायाभूत सुविधांची उभारणी करून चांगले राहणीमान आणि सामाजिक सुविधा उपलब्ध करून देणे हा या मार्गिकांच्या विकासाचा उद्देश आहे.