मुंबईत उद्यापासून सर्वसामान्यांसाठी ‘बेस्ट’ बससेवा सुरू!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत उद्यापासून सर्वसामान्यांसाठी ‘बेस्ट’ बससेवा सुरू!

मुंबई : मुंबईत उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्टची बसेसवा सुरू होत आहे. मात्र कोणत्याही बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नसतील. याशिवाय मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे. असंबेस्टकडून कळवण्यात आलं आहे. मुंबईत लोकल प्रवास हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित राहणार असला, तरी बस मात्र १०० टक्के प्रवासी क्षमतेसह धावणार आहेत. परंतु, बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास असलेली मनाई कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, मुंबई, ठाण्यात मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. मात्र, दुकाने खुली ठेवण्याची वेळ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, हॉटेल्समध्येही क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. दोन दिवसांच्या गोंधळानंतर राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नवीन मार्गदशक तत्त्वे लागू केली. त्यानुसार करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायू खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे निर्बंध किती शिथिल करायचे याचा निर्णय दर आठवड्याला घेतला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. ज्या विभागात करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण (पॉझिटिव्हिटी दर) ते १० टक्क्यांच्या दरम्यान आहे आणि प्राणवायूच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक खाटा रुग्णांनी व्यापलेल्या आहेत. अशा शहरांचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला आहे. मुंबईत प्राणवायूच्या खाटांपैकी के वळ ३२.५१ टक्के खाटा भरलेल्या आहेत. मात्र करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण .५६ टक्के असल्यामुळे मुंबईचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला आहे.