राजीव सातवांचे निधन अतिशय धक्कादायक आणि दुःखद : देवेंद्र फडणवीस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राजीव सातवांचे निधन अतिशय धक्कादायक आणि दुःखद  : देवेंद्र फडणवीस

नागपूर : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत काँग्रेस नेते- खासदार राजीव सातव यांच्या निधनावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते  देवेंद्र फडणवीसांनी  तीव्र शोक व्यक्त केला.

ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, " काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो ! ॐ शांती. "

हिंदुस्थान समाचार