किशन रेड्डींनी घेतला गोवा पर्यटन विभागाच्या कार्याचा आढावा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

किशन रेड्डींनी घेतला गोवा पर्यटन विभागाच्या कार्याचा आढावा

पणजी  : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्रीय संस्कृती,पर्यटन आणि ईशान्य भारत विकास मंत्री गंगापूरम किशन रेड्डी यांनी सोमवारी सकाळी पणजी येथे गोवा पर्यटन तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध कार्यक्रम आणि योजनांचा आढावा घेतला.
मान्यवरांनी मुखकवच आणि सामाजिक अंतराचे पालन करीत गोवा पर्यटन विभागाच्या विविध कार्यावर- विषयांवर चर्चा केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्य पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर देखील उपस्थित होते. या संदर्भात ट्वीटर द्वारे गंगापूरम किशन रेड्डी म्हणाले, " पणजी येथे सकाळी गोवा पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. गोवा राज्याचे पर्यटन आणि संस्कृतीचा प्रसार-प्रचार करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली."