देशात ३०,९४८ नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देशात ३०,९४८ नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली, : देशात गेल्या २४ तासांमध्ये ३० हजार ९४८ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३८ हजार ४८७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

देशातील एकूण बाधितांची एकूण संख्या ३,२४,२४,२३४ झाली आहे. आजपर्यंत देशात ३,१६,३६,४६९ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३,५३,३९८ असून, आजपर्यंत देशात ४,३४,३६७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशात आजपर्यंत ५८,१४,८९,३७७ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी मागील ५२,२३,६१२ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झाले आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट पर्यंत देशात ५०,६२,५६,२३९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी १५,८५,६८१ नमुन्यांची काल तपासणी केली गेली, अशी माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आलेली आहे