राज्यसभा निवडणुकीसाठी द्रमुक नेत्यांचा अर्ज दाखल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यसभा निवडणुकीसाठी द्रमुक नेत्यांचा अर्ज दाखल

चेन्नई 21 सप्टेंबर (हिं.स) आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी द्रविड मुन्नेत्र कळगमचे उमेदवार डॉ कनिमोळी एनव्हीएन आणि केआरएन राजेश कुमार यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज विधानसभा परिसरात दाखल केला. यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळगमचे अधिनेता एम के स्टालिन, जेष्ठ नेते खासदार त्रिची शिवा, खासदार कनिमोळी आणि मान्यवर-नेते उपस्थित होते. एम के स्टालिन यांनी उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.