फिरोजपूर बॉर्डवर दोन घुसखोर ठार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

फिरोजपूर बॉर्डवर दोन घुसखोर ठार

चंदीगड : पंजाबच्या फिरोजपूर बॉर्डरवर बीएसएफच्या जवानांनी शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या दोन घुसखोरांना कंठस्नान घातले. तर जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या नागबेरन-तरसर जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान आज शनिवारी सकाळी चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. दहशतवाद्यांकडून एक एके रायफल आणि मॅग्जीन जप्त केली आहे. परिसरात इतर दोन ते तीन दशतवादी लपल्याची माहिती जवानांना असून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूकडून गोळीबार होत आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.