पंतप्रधान मोदींचा पुतळा रातोरात हटवला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधान मोदींचा पुतळा रातोरात हटवला

पुणे, :  देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली. औंध गावात उभारण्यात आलेल्या मंदिरात मोदींचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. मात्र, आता हा पुतळा हटवण्यात आला आहे. मोदींचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्याची माहिती सकाळी समोर आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंदिराजवळ पोहोचले. मोदींचा पुतळा भाजप कार्यालयात हलवण्यात आल्याचे समजते.

औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारले. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिर उभारणीचे वृत्त देशात चर्चिले गेले. यावर बरीच टीकादेखील झाली. त्यानंतर भाजप नेतृत्त्वाने याची दखल घेतली. आज सकाळी औंधमधील मंदिर झाकण्यात आलं. त्यातील मोदींचा पुतळादेखील मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे.