कोरोना अपडेट : देशात 24 तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना अपडेट : देशात 24 तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. दररोज लाखो रुग्णांची भर पडत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर, ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४००० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले असून कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात ३७,०४,८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.