हायकोर्टाने स्थगित केला तृणमूल नेत्यांचा जामीन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

हायकोर्टाने  स्थगित  केला  तृणमूल  नेत्यांचा  जामीन

कोलकाता : नारदा स्टिंग प्रकरणात सीबीआयने सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या दोन मंत्र्यांसह चौघांना अटक केली होती. यामध्ये फिरहाद हकीम, मंत्री सुव्रत बॅनर्जी, आमदार मदन मित्रा, सोवन चॅटर्जी यांचा समावेश होता. यासर्वांना न्यायमूर्ती अनुपम मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील विशेष सीबीआय न्यायालयाने संध्याकाळी जामीन दिला. मात्र, उच्च न्यायालयाने सोमवारी रात्री या जामिनाला स्थगित केलेय. 

 पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सीबीआयच्या धाडसत्रामुळे दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नारदा घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुव्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली. यानंतर चारही नेत्यांना सीबीआयने कार्यालयात नेले. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या. तृणमूल काँग्रेसच्या चार नेत्यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे समजताच बंगालच्या राजकारणात भूकंप झाला. नेत्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू झाले. यातच ममता या सीबीआय कार्यालयात गेल्या. या साऱ्या घडामोडींमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तृणमूलच्या मंत्र्यांची चौकशी केली. ममता बॅनर्जी तब्बल 6 तास सीबीआयच्या कार्यालयात ठाण मांडून होत्या. 

  राज्यपाल जगदीप धनकड यांनी परवानगी दिल्यानंतर सीबीआयने नारदा घोटाळ्यातील चारही आरोपी नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु, या नेत्यांवर कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांची पूर्वपरवानगी नसल्याचा दावा करत ममता बॅनर्जींनी सीबीआयच्या कारवाईला विरोध दर्शवला. दरम्यान संध्याकाळी सीबीआय कोर्टाने या चारही आरोपीना 50 हजार रूपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर दिलेला जामीन हायकोर्टाने स्थगित केला.