"तौक्ते" वादळग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

"तौक्ते" वादळग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये १६ १७ मे २०२१ रोजी "तौक्ते" चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला. या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जीविताचे मालमत्तेचे नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने "तौक्ते" चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदतीचे वाटप करण्यासाठी एकशे सत्तर कोटी बहात्तर लाख त्र्याहत्तर हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. अशाप्रकारे वादळग्रस्तांना भरीव मदत करून मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वचनपूर्ती केली आहे.

 

 "तौक्ते" चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जीविताचे मालमत्तेचे नुकसान झाले. कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रसह संपूर्ण राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा प्रचंड प्रमाणात तडाखा बसून शेती आणि फळबागांचे नुकसान झाले. या भीषण परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने दिवसीय कोकण दौरा केला. कोकण दौऱ्यात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना श्री. वडेट्टीवार यांनी वादळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते.  दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करून वादळग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती. या अनुषंगाने महसूल वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. "तौक्ते" चक्रीवादळामुळे बहुवार्षिक पिकांचे नुकसान, मृत जनावरांसाठी मदत, पूर्णतः नष्ट किंवा अंशतः पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरे, मत्स्य बोटी, जाळ्यासाठी अर्थसहाय्य , मत्स्यबीज शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार टपरीधारक यांना नुकसानीसाठी मदत इतर अनुद्येय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी राज्य शासनाच्या निधीमधून एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत