राज्यांना पुरविण्यात आल्या 66 कोटी 89 लाखांहून अधिक मात्रा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यांना पुरविण्यात आल्या 66 कोटी 89 लाखांहून अधिक मात्रा

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून (मोफत पुरवठा पद्धतीने) आणि राज्यांकडून थेट खरेदीच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत एकूण 66 कोटी 89 लाखांहून अधिक (66,89,80,635) मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे आणि आणखी 1 कोटी 56 लाखांहून अधिक (1,56,96,450) मात्रांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या 4 कोटी 37 लाखांहून अधिक (4,37,83,160) मात्रा अजूनही शिल्लक असून यापुढील काळातील लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा करून त्यांना सहकार्य करीत आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस उत्पादकांनी उत्पादित केलेल्या लसीच्या साठ्यापैकी 75 % साठ्याची खरेदी करून त्याचा (मोफत) पुरवठा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करीत आहे.