सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ

मुंबई : ब-याच दिवसाच्या सततच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली. सोने - चांदीच्या दरात दररोज बदल होत आहेत. मात्र आता कोरोनाच्या काळात सतत सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली.
आजही २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत २०० रुपयांची वाढ होवून दर ४६,४०० रुपयांवर स्थिरावला आहे. तर चांदीच्या दरातही आज वाढ झालेली पाहायला मिळाली. ग्राहकांना १० ग्रॅमसाठी आता ६५२ रुपये मोजावे लागणार आहेत. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो.

जाणून घेवूया सोने-चांदीचे आजचे दर.

सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)
मुंबई - २४ कॅरेट - ४७,४०० रुपये, २२ कॅरेट - ४६,४०० रुपये
पुणे - २४ कॅरेट - ४९,०५० रुपये, २२ कॅरेट - ४५,८२० रुपये
नागपूर - २४ कॅरेट - ४७,४०० रुपये, २२ कॅरेट - ४६,४०० रुपये
नाशिक - २४ कॅरेट - ४९,०५० रुपये, २२ कॅरेट - ४५,८२० रुपये
चांदीचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक - चांदीचा दर ६५२ रुपये आहे.