नागपूर-हैदराबाद विमानाची मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नागपूर-हैदराबाद विमानाची मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

मुंबई : नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या नॉन-शेड्युल विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते विमान मुंबईच्या दिशेने वळविण्यात आले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री 9.20 वाजता या विमानाचे सुखरूप लँडिंग करण्यात आले. विमान सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले मंदार भारदे यांनी यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन करण्यात आले. 

नागपुरातून विझक्रॉफ्ट कंपनीच्या विमानाने गुरुवारी हैदराबादसाठी उड्डाण केल्यानंतर त्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिक केसरी सिंग यांना लक्षात आले. आपातकालिन परिस्थितीत विमान उतरवण्यासाठी त्याचे वजन कमी असणे आवश्यक होते. त्यामुळे हे विमान तासभर आकाशात घिरट्या घालत राहिले. यादरम्यान मुंबई विमानतळावर अलर्ट देण्यात आला. विमानातील इंधन संपत आल्याने त्याचे वजन कमी होऊन ते विमान रात्री 9.20 वाजेच्या सुमाराला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. मंदार भारदे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या ऑपरेशमध्ये विमान सुखरूप खाली उतरवण्यात यश मिळाले.