पतंजली संपादित 'रुची सोया’च्या वतीने रु 4,300 कोटींच्या एफपीओची नोंदणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पतंजली संपादित 'रुची सोया’च्या वतीने रु 4,300 कोटींच्या एफपीओची नोंदणी

मुंबई : वैविध्यपूर्ण एफएमसीजी आणि एफएमएचजी-केंद्री कंपनी रुची सोयाने ताज्या प्रस्तावाच्या (फ्रेश इश्यू) मार्गाने रु. 4300 कोटी उभारण्याकरिता नियामकाकडे कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. पतंजली रेझोल्यूशन प्लानच्या अंमलबजावणीनंतर आरएसआयएल ही खाद्य तेल क्षेत्रातील एक सर्वात मोठी एफएमसीजी आणि एकीकृत खाद्य तेल रिफायनिंग कंपनी बनली. पाम आणि सोया प्रकारातील संपूर्ण वॅल्यू चेन दरम्यान हे एक हेल्दी मिक्स मानले जाते. त्याशिवाय, पाम वृक्षारोपणातील हे एक आघाडीचे नाव असून त्यांच्याकडे 9 राज्यांमध्ये 2,55,207 हेक्टरची सक्षम आणि विकासनशील जमीन आहे.      50% प्रस्ताव पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIBs)ना, 15% -संस्थात्मक गुंतवणूकदार (NIIs) आणि 35% वैयक्तिक विक्रेते गुंतवणूकदार (RIIs) यांच्याकरिता ठेवण्यात येईल.  

या व्यवहारात ताजा प्रस्ताव विक्रीसाठी खुला करण्यात येणार असून त्याद्वारे जमा होणारी रक्कम कंपनी व्यवसायाशी निगडीत काही प्रलंबित कर्ज चुकविण्यासाठी तसेच खेळत्या भांडवली गरजांकरिता आणि अन्य सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.@@ रुची सोया हे भारतात सोया फूड्सचे आद्यकर्ते असून ब्रँड नेमन्यूट्रेला’, 1980 दरम्यान रुची सोयाने लॉन्च केला

 पतंजली ग्रुपने रुची सोया संपादित केल्यानंतर रुची सोया ही भारतातील सर्वात मोठी आणि वैविध्यपूर्ण एफएमसीजी आणि एफएमएचजी-केंद्री कंपनी झाली. जिचे 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी, आर्थिक वर्ष 2020, आर्थिक वर्ष 2019 आणि आर्थिक वर्ष 2018 करिता कामकाजातून येणारा महसूल आणि अन्य उत्पन्न अनुक्रमे रु. 11,52,347.56 लाखरु. 13,17,536.56 लाखरु. 12,82,925.56 लाख आणि रु. 12,02,928.03 लाख याप्रमाणे होते. अनुक्रमे याच कालावधी दरम्यान रुची सोयाचा ईबीआयटीडीए रु. 74,777.41 लाखरु. 45,847.22 लाखरु. 22,195.52 लाख आणि रु. (501,414.32) यानुसार सोबत ईबीआयटीडीए मार्जिनसह एकूण महसूलाची टक्केवारी 6.49%, 3.48%, 1.73% आणि (41.68)%. उद्योग क्षेत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2019 पासून रुची सोयाची आर्थिक कामगिरी हे पतंजली समुहाने केलेल्या संपादनाचे फलित असल्याचे समजते.  

 

 पतंजली समूहाच्या संपादनाचा फायदा रुची सोयाला मिळाला. पतंजलीचे संपूर्ण भारतात वितरण जाळे असून ते भारतातील एफएमसीजी आणि एफएमएचजी क्षेत्रात महत्त्वपूर्ण तंत्रविषयक माहितीचे जाणकार म्हणून ओळखले जातात. पतंजली ग्रुपचा विस्तार फार मोठा आहे. डीआरएचपी अनुसार 31 मार्च 2021 पासून पतंजली वितरण जाळ्यात सुमारे 3,409 पतंजली वितरक, 3,326 आरोग्य केंद्रे, 1,301 पतंजली चिकित्सालये, 273 पतंजली मेगा स्टोअर आणि 126 पतंजली सुपर डिस्ट्रीब्यूटर आहेत. तसेच 126 पतंजली सुपर डिस्ट्रीब्यूटर 3,409 पतंजली वितरकांनी 5,45,849 कस्टमर टच पॉइंट उपलब्ध करून दिली आहेत. ज्यामध्ये सुमारे 47,316 फार्मसी, केमिस्ट आणि औषधांच्या दुकानांचा समावेश आहे. रुची सोया ही पतंजली समुहाचा भाग झाल्याने पतंजली बिस्किटे, न्यूडल्स आणि ब्रेकफास्ट सेरियल व्यवसायात सामावून जाणार आहे. ती आता पतंजली ग्रुप मालकी अंतर्गत पतंजली ब्रँडखाली पतंजली बिस्किटे, न्यूडल्स आणि ब्रेकफास्ट सेरियलची संपूर्ण उत्पादन श्रेणीची विक्री करेल. गेली 14 वर्षे न्युट्रास्युटीकल आणि वेलनेस क्षेत्रात व्यवसाय केल्यानंतर आता पतंजलीच्या साथीने रुची सोयानेपतंजली अँड न्यूट्रेलाहे लॉन्च केले आहे

 

एनटीपीसी - आर्थिक वर्ष 21 लेखापरीक्षणाचे निष्कर्ष

नवी दिल्ली : ऊर्जा मंत्रालयांतर्गत महारत्न श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि देशातील सर्वात मोठी वीज उत्पादक आणि 65825 मेगावॅटची विद्यमान स्थापित क्षमता असलेल्या एनटीपीसी लिमिटेडने आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निष्कर्ष तसेच आर्थिक वर्ष 2021 च्या चौथ्या तिमाहीसाठी बिगर लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष जाहीर केले.

एनटीपीसी समूहाने मागील वर्षीच्या 290.19 अब्ज युनिट्सच्या तुलनेत आर्थिक वर्ष 21 मध्ये  सर्वाधिक  314.07 अब्ज युनिट उत्पादन नोंदवले. स्टॅन्ड अलोन आधारे आर्थिक  वर्ष 21 मध्ये  एनटीपीसीची एकूण वीज निर्मिती 270.91 अब्ज युनिट होतीजी मागील वर्षी 259.62 अब्ज युनिट होती. कोळसा केंद्रांनी  91.43 टक्के उपलब्धता फॅक्टरसह 54.56% राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत 66 %  प्लांट लोड फॅक्टर साध्य केले.

एनटीपीसीने वर्षभरात बिलाच्या  रकमेच्या 100% पेक्षा जास्त रक्कम वसूल केली असूनएक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे जी आतापर्यंतची सर्वाधिक वसूली आहे. आर्थिक वर्ष 21मध्ये एकूण उत्पन्न 3.06 टक्क्यांनी वाढून 103,552.71 कोटी रुपये  झाले ,जे  आर्थिक वर्ष 20 मध्ये,100,478.41 कोटी रुपये होते

आर्थिक वर्ष 21मध्ये एनटीपीसीने सर्वाधिक 13,769.52 कोटी रुपये करोत्तर नफा नोंदवला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 36.16% वाढ झाली आहेगेल्या वर्षी 10,112.81  कोटी रुपये नफा  झाला होता.

एनटीपीसी लिमिटेडच्या संचालक मंडळाने पेड-अप समभाग भांडवलाच्या  31.5 % म्हणजे 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागासाठी  3 रुपये 15 पैसे अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे,ज्यासाठी सर्वसाधारण सभेत भागधारकांची  मान्यता आवश्यक आहे.  कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये पेड-अप समभाग भांडवलाच्या @30% म्हणजेच प्रत्येक समभागासाठी 3 रुपये अंतरिम लाभांश दिलेला आहे. कंपनीकडून  सलग 28 व्या वर्षी लाभांश जाहीर झाला आहे.